नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे चार लाखाच्या ऐवज लंपास केला. महामार्गावरील लेखानगर भागात ही घरफोडी झाली. यात चरोट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंदना मन्साराम अहिरे (रा.नयनतारा प्रेसि.काका का ढाब्याजवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अहिरे कुटुंबिय गेल्या १२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद फ्लॅटचे लॅचलॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ८५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.