त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मानवी वस्तीत बिबट्यचा वावर वाढल्याच्या घटना आता नियमीत होऊ लागल्यामुळे त्यावर काही तरी उपाय आता वनविभागाने करावी अशी मागणी होत आहे. गुरुवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी येथे सायंकाळी शेतामध्ये काम करणाऱ्या दोन जणांवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे ते जखमी झाले. त्यात एक महिला एका पुरुषाचा समावेश आहे. या दोघांनाही नाशिकच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी पिंपरी येथे बिबट्याच्या हल्लात काळू सोमा वाघ (४५) यांचे मालकीच्या शेतात सायंकाळी ४.४५ वाजता अचानक बिबट्याने हल्ला करून पाठीवर, हातावर पंजा मारून जखमी केले. त्यानंतर शेजारी असलेल्या ताराबाई विठ्ठल मूर्तडक (३५) यांच्या मालकीच्या गोठ्यामध्ये बिबट्याने पुन्हा हल्ला करून त्यांना जखमी केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर बिबट्याचा शोध सुरु केला. या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.