नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीला शिवभक्तांची कोणतीही गैरसोय होवू नये याकरीता नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने जादा बसेसचे नियोजन केले आहे.
सदयस्थितीत तपोवन डेपो येथून त्र्यंबकेश्वरकरीता दररोज १५ बसेसच्या माध्यमातून १०६ बसफेर्या करण्यात येतात. तर नाशिकरोड डेपो येथून १३ बसेसच्या माध्यमातून ७८ बसफेर्या करण्यात येतात. एकूणच सदयस्थितीत दोनही डेपो मिळून त्र्यंबकेश्वर करिता दिवसभरात १८४ बसफेर्या करण्यात येतात.
शुक्रवार ८ मार्च रोजी महाशिवरात्री असल्याकारणाने या नियमित १८४ बसफेर्यांव्यतिरिक्त तपोवन डेपो येथील ९ बसेसच्या माध्यमातून जादा ५४ बसफेर्या तर नाशिक डेपो येथील ६ बसेस माध्यमातून जादा ४८ बसफेर्या अशाप्रकारे एकूण १५ बसेसच्या माध्यमातून १०२ जादा बसफेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
एकूणच महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण नाशिक शहरातून त्र्यंबकेश्वरकरीता नियमित तसेच जादा मिळून एकूण ४३ बसेसच्या माध्यमातून २८६ बसफेर्या करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी या बसेसचा लाभ घ्यावा. असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.