नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी १२ हजाराची लाच प्रकरणात पोलिस हवालदार संतोष रामनाथ लांडे व पोलिस शिपाई राघव छबुराव कोतकर हे लाच लुचपत प्रतबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्याचे कामकाज पोलिस हवालदार संतोष रामनाथ लांडे यांच्याकडे असून सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी लांडे यांनी यांनी पोलिस शिपाई राघव छबुराव कोतकर यास भेटून माझ्या कडे ये असे सांगितले असता तक्रारदार हे कोतकर यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांचेकडे १५ हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १२ हजार रुपये लाचेची रक्कम कोपरगाव तालुका पो.स्टेशन येथील CCTNS कक्षात स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. नाशिक
तक्रारदार- पुरुष, 55 वर्ष, कोपरगाव, अहमदनगर
*आलोसे –
1)संतोष रामनाथ लांडे , पो. हवालदार ब. नं.1432 नेम. कोपरगाव तालुका पो. ठाणे जि. अहमदनगर .
2) राघव छबुराव कोतकर पो. शि. ब. नं.940 नेम. कोपरगाव तालुका पो. ठाणे जि. अहमदनगर
*लाचेची मागणी- दिनांक ०६/०३/२०२४ रोजी 15000 रु तडजोडीअंती 12000 रु.
*लाच स्विकारली – दिनांक 07/03/2024 रोजी 12000 रु.
*लाचेचे कारण – कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्याचे कामकाज आरोपी नं 1) यांच्याकडे असून सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी आलोसे नं 1) यांनी आलोसे नं 2) यास भेटून माझ्या कडे ये असे सांगितले असता तक्रारदार हे आलोसे नं .2) यांना भेटले असता आलोसे नं 2 ) यांनी तक्रारदार यांचेकडे 15,000 रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 12000 रु. लाचेची रक्कम कोपरगाव तालुका पो.स्टेशन येथील CCTNS कक्षात स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे.
*आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी
मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर
*सापळा अधिकारी- श्री परशुराम कांबळे पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*सापळा पथक*-
पो. हवा. प्रफुल्ल माळी
पो. हवा. सचिन गोसावी
पो. ना. विलास निकम
*सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक* .