नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा परिषदेमधील सामान्य प्रशासन विभागांतर्गंत कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावरुन सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी 2, वरिष्ठ सहाय्यक या पदावरुन कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदी 9 व कनिष्ठ सहाय्यक या पदावरुन वरिष्ठ सहाय्यक पदी 3 अशा 14 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी गुरुवार दि. 07 मार्च 2024 रोजी समुपदेशन करुन त्यांच्या विनंतीनुसार त्यांची पदस्थापना केली व पदस्थापना आदेश दि. 07 मार्च 2024 रोजीच निर्गमित करण्यात आले, असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्वच विभागाच्या सर्व पदोन्नत्या करण्याबाबत आदेशीत केले होते व त्यानुसार सामान्य प्रशासन विभागांतर्गंत कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक व कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांची पदोन्नतीबाबत मागील तीन महिन्यांपासून कार्यवाही चालु होती. जिल्हा परिषदेमधील सर्व विभाग व सर्व पंचायत समित्यांमधील पात्र कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रस्ताव मागावून व त्यांची छानणी करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विभागीय पदोन्नती समितीची बैठक दि. 08 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आली. त्यास अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रदीप चौधरी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रशांत पवार व सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी उपस्थित होते.
वरील सर्व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश दि. 07 मार्च 2024 रोजी देऊन संध्याकाळी कार्यालयीन वेळेनंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे व दि. 11 मार्च 2024 रोजी हजर होणेबाबत निर्देशित करण्यात आले आहे. सदर पदोन्नती केल्याबद्दल लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांची सदिच्छा भेट घेऊन पदोन्नती केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यापुर्वी सामान्य प्रशासन विभागाकडून आश्वासित प्रगती योजना, परिचर व वाहनचालक यामधुन कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती, अनुकंपा पदभरती याबाबत कार्यवाही केली असून आता या तीन संवर्गाचे पदोन्नती केली आहे व पात्र सर्व अधिकारी व कर्मचारी यांना देय असणारे सर्व लाभ उपलब्ध करुन दिले आहेत.
याकरिता सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक सुनिल थैल, भास्कर कुवर, कानिफ फडोळ, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोनाली भार्गवे, निवृत्ती बगड, सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, सामान्य प्रशासन विभागातील लघुलेखक साईनाथ ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातील गौतम अग्निहोत्री व सामान्य प्रशासन विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी यांनी याबाबत कामकाज केले आहे.
(पदोन्नत अधिकारी यांचे नाव, पदोन्नतीने दिलेले कार्यालय खालीलप्रमाणे)
1.अनिल गिते, सहाय्यक प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जि. प. नाशिक
2.अनिल सानप, सहाय्यक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, मालेगांव
3.छाया सोनवणे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग, जि. प. नाशिक
4.राजेंद्र येवला, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जि. प. नाशिक
5.धनराज पवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, मालेगांव
6.दिलीप पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, सुरगाणा
7.विलास नन्नावरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती सिन्नर
8.मंगेश चव्हाण, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जि. प. नाशिक
9.ओमप्रकाश पाटोळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, येवला
10.किरण माळवे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, सुरगाणा
11.चंद्रकांत पगारे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, मालेगांव
12.गजेंद्र घाडगे, वरिष्ठ सहाय्यक, सामान्य प्रशासन विभाग, जि. प. नाशिक
- जिवन पारधी, वरिष्ठ सहाय्यक, सामान्य प्रशासन विभाग, जि. प. नाशिक
- इंदिरा गांगुर्डे, वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती, कळवण
सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन
सर्व विभागांतर्गत पदोन्नती प्रकरणे व आश्वासित प्रगती योजनेची प्रकरणे मार्गी लावण्यासंदर्भात विभागप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत, पदोन्नती मिळालेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन, ग्रामीण भागात सेवा देताना प्रशासकीय कामात गतिमानता आणता येईल याकडे अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष द्यावे.
आशीमा मित्तल,
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक