नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे २ लाख ६३ हजाराच्या ऐवज लंपास केला. नांदूरगावात ही घरफोडी झाली. याच चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरुन नेले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिभाऊ अर्जुन सुरवाडे (रा.ऐक्यवास्तू अपा.समोर,मांगीर बाबा मंदिराजवळ नांदूरगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सुरवाडे कुटुंबिय मंगळवारी (दि.५) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ६३ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार सुरंजे करीत आहेत.