नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मित्राची स्कोडा कार परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पावधीच्या कामानिमित्त वापरण्यासाठी नेलेली कार अनेक महिने उलटूनही परत न मिळाल्याने मुळ मालकाने शोध घेतला असता अपहाराचा हा प्रकार पुढे आला असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेश रविंद्र बोरसे (रा.अमळनेर जि.जळगाव) असे मित्राची फसवणुक करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. याबाबत प्रथम कांतीलाल येवलकर (रा.रामेश्वरनगर,बळवंतनगर) या युवकाने फिर्याद दिली आहे. संशयित बोरसे व तक्रारदार येवलकर हे दोघे एकमेकांचे मित्र असून त्यातून ही घटना घडली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात संशयित बोरसे हा येवलकर यांच्याकडे आला होता.
पुणे येथे कामानिमित्त जाण्यासाठी त्याने येवलकर यांची स्कोडा रॅपीड एमएच १४ इएफ ९२८४ कार अल्पावधीसाठी नेली होती. अनेक महिने उलटूनही मित्राने कार परत न केल्याने येवलकर यांनी संपर्क साधला असता संशयिताने टाळाटाळ केली. त्यामुळे येवलकर यांनी कारचा शोध घेतला असता ती परस्पर विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक समोर आला अधिक तपास जमादार झाडे करीत आहेत.