मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेणुका सुत गिरणी कर्ज आर्थिक फसवणूक प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून अटकेत असलेल्या ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रेणुका सुत गिरणी कर्ज आर्थिक फसवणूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्या जामिनावर आज मालेगाव अपर सत्र न्यायालयात अद्वय हिरे यांच्या जामीन अर्जावर निकाल होता.
काल दिवसभर सुनावणी झाल्यांनतर न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत राखीव ठेवण्यात आला होता. जामिनावर निकाल देतांना
मात्र आज त्यांचा जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.