इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील केरवेळे गावातील जादूटोणा करतो या संशयातून एका ७५ वर्षीय वृद्धाला आगीवर नाचवण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. करणी करण्याच्या संशयावरून त्याला अगोदर मारहाण करण्यात आली. त्यानंतर आगीवर नाचण्यात आले.
आगीत नाचल्यामुळे वृद्धाच्या पायाला फोड आले व पाठीवर जखमा झाल्या. विशेष म्हणजे एवढा गंभीर प्रकार होऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असला, तरी त्याला धाब्यावर बसवून करणी, जादूटोणा आणि भानामतीसारखे प्रकार केले जात असतांना पोलिस या विषयाकडे गांभीर्याने बघत नाही.