मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव मध्ये दातानगर भागात साडेतीन वर्षाच्या निष्पाप बालकांना एका तेरा वर्षाच्या विधी संघर्षित बालकाने साठलेल्या सांडपाण्यात फेकून दिल्याने नाका तोंडात पाणी जाऊन त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली.मुलाला पाण्यात फेकून दिल्याची घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
हस्सान मलिक मुदस्सीर हुसेन असे मृत मुलाचे नाव आहे. हलवाई मशीद परिसरातील यंत्रमाग कारखान्याजवळ हस्सान त्याच्या मित्रांसोबत खेळत असतांना या ठिकाणी एक टोपी घातलेला १३ वर्षाचा विधी संघर्षित मुलगा आला आणि त्याने हस्सान उचलून घेतले व सांडपाण्यात फेकून दिले.
या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस सिसिटीव्हीच्या आधारे विधीसंघर्षित मुलाचा शोध घेत आहे.