नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विवाहित महिलेवर चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना सामनगाव येथे घडली आहे. या हल्ल्यात महिलेचा भाचा अभिषेख गंभीर जखमी झाला आहे. जखमी अभिषेक यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत आहे
बुधवारी रात्री ही घटना सामनगाव येथील तांबोळी हॉस्पिटल जवळ घडली. येथे राहणारे मूळचे उत्तरप्रदेश येथील पाणीपुरीचा व्यवसाय करणारे सुदाम बणारीया यांनी घेतलेल्या भाड्याच्या घरात हा हल्ला झाला. या घरात पत्नी क्रांती सह तो येथे राहत होता. या घरात बुधवारी रात्री क्रांती व भाचा अभिषेक (२७) हे दोघे घरात एकटे होते. यावेळी अज्ञात इसमाने क्रांती व अभिषेक या दोघांवर चाकूने हल्ला केला यात क्रांतिचा मृत्यू झाला तर अभिषेक याच्यावही वार केल्याने तो गंभीर जखमी झाला.
क्रांतीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने ती जागीच मृत्यू झाला. हा हल्ला करणारे हल्लेखोर पसार झाले, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे दाखल झाले.