नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळा पाथर्डी मार्गावरील एका सदनिकेत सुरू असलेला कुंटनखान्यावर पोलीसांनी कारवाईत करत दोन पिडीताना ताब्यात घेतले असून सहा जणांना गजाआड केले आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक (पिटा) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली शहरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आयेशा आजिम कादरी (रा.स्वराज्यनगर,पाथर्डी फाटा),शुभम चव्हाण,विजयकुमार नायर (रा.आर्केड अपा.दामोदरनगर), सुलेमान मुबारक हुसेन अन्सारी (रा.सुखदेवनगर),अजय बबलू चव्हाण (रा. वेदांत पार्क, दामोदरनगर) व रवी कोंडाजी मुठाळ (रा.लहवित) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
वडाळा पाथर्डी मार्गावरील हिल क्रिस्ट सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख व इंदिरानगरचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंगळवारी (दि.५) रात्री बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली.
या प्रकाराचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील बोंडे करीत आहेत. ही कारवाई उपनिरीक्षक संदिप पवार, सुहासिनी बारेला, हवालदार जावेद खान,शिपाई मुशरीफ शेख,चंद्रभान पाटील,धनवंता राऊत,सोनवणे आदींच्या पथकाने केली.