इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः गृहमंत्री अमित शाह यांचा राज्य दौरा झाल्यानंतर लोकसभेच्या जागा वाटपाची जोरदार चर्चा सुरु झाली. त्यानंतर महायुतीच्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचे आकडेही बाहरे आले. त्यानंतर शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपमध्ये जागावाटपावरुन वाद सुरु झाले. त्यात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर थेट हल्ला करत केसाने गळा कापू नका, विश्वासघात करू नका. माझे नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारा भाजपला दिला…
कदम म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही भाजपसोबत आलो आहोत. महाराष्ट्रातील नेत्यांना त्यांनी समज द्यावी. मोदी आणि शाह यांनी महाराष्ट्रातील नेत्यांचे कान उपटले पाहिजेत. आपला पक्ष वाढवताना विश्वासाने बरोबर आलेल्यांचा गळा कापला, तर भाजपसाठीच ते चांगले नाही. त्याचे भान भाजपच्या नेत्यांनी ठेवायला हवे. पुन्हा आमचा विश्वासाघात झाला तर…मागच्या निवडणुकीमध्ये काय झाले ते विसरू नका.
या सर्व वादानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. अजून जागा वाटप झालेले नाही. चर्चेत असलेले आकडे हे चुकीचे आहे. पण, या सर्व घडामोडीवर शिंदे गट व अजित पवार गट मात्र आक्रमक झाला आहे.