नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर आज नाशिकच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. उद्या छगन भुजबळांचा वाढदिवस असल्यामुळे वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी येणा-या लोकांची तपासणी केली जाणार आहे. थेट जवळ जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. नाशिकच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी छगन भुजबळ यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
काल भुजबळांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेजद्वारे धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुध्द अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकी प्रकरणाची तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली आहे. या धमकी मेसेजमध्ये भुजबळ यांना तु जास्त दिवस राहणार नाही…तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही…तु नीट रहा…नाहीतर तुला बघून घेईल असे म्हटले आहे.
या फोन करणा-यांचा नंबरही व्हॅाटलअपवर आला आहे. त्यामुळे पोलिस या आरोपीचा शोध घेत आहे. ही धमकी नेमकी काय कारणातून आली आहे. त्याचा उलगडा मेसेजमधून होत नाही.