बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खेलो इंडिया पदक विजेते खेळाडूही आता सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र

by India Darpan
मार्च 6, 2024 | 11:52 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 17

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) क्रीडा विभागाच्या सहकार्याने खेळाडूंसाठी भर्ती, पदोन्नती आणि प्रोत्साहन अशा चौकटीतील नियमांमध्ये सर्वसमावेशक सुधारणा केल्या आहेत. 4 मार्च रोजी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी झाल्या आहेत. वाढीव सवलती, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता आणणे हे या सुधारित नियमावलीचे उद्दिष्ट आहे.

खेलो इंडिया पदक विजेते खेळाडू आता सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र असतील, असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी जाहीर केले. क्रीडा परिसंस्थेची मशागत, तळागाळातील गुणवत्तेची जोपासना आणि खेळांचे रूपांतर एका व्यवहार्य कारकीर्दीत करणे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला धरुन आता खेळो इंडियाचे खेळाडू शासकीय नोकऱ्यांसाठी पात्र ठरतील, असे त्यांनी सांगितले.“

डीओपीटीने इंडिया स्पोर्टसच्या सल्लामसलतीने शासकीय नोकऱ्या करण्यासाठी उत्सुक खेळाडूंसाठीच्या पात्रतेच्या निकषांमध्ये प्रागतिक सुधारणा घडवून आणल्या आहेत“, असे ते पुढे म्हणाले. खेलो इंडिया- युवा, विद्यापीठ, पॅरा आणि हिवाळी स्पर्धांसाठीही आता हे पात्रता निकष लागू होतील. त्यातबरोबर खेळ आणि क्रीडा स्पर्धांसाठीच्या या निकषात आता विविध क्रीडा प्रकारांचाही समावेश केला आहे.

सुधारित नियमांनुसार, खेलो इंडिया युथ गेम्स (१८ आणि त्याहून अधिक वयोगटातील सहभागींसाठी), खेलो इंडिया हिवाळी गेम्स, खेलो इंडिया पॅरा गेम्स आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स यांसारख्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आता सरकारी नोकरीच्या संधींसाठी पात्र ठरतील. शिवाय, भारतीय शालेय खेळ महासंघामध्ये यश मिळवणारे देखील अशा पदांसाठी पात्र ठरू शकतील.

महत्त्वाच्या वाटचालीत, खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेला इतर प्रतिष्ठित स्पर्धा आणि स्पर्धांच्या श्रेणीत सामील केल्यामुळे या सुधारणा एक मैलाचा दगड ठरतील. भारताला क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवण्यासाठी खेळाडूंना मदत करण्यासाठी हे सुधारित नियम महत्त्वपूर्ण असल्याचे ठाकूर म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची या संकेतस्थळांवर उपलब्ध; १३ मार्चपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

Next Post

टपाल विभागाच्यावतीने ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजने’साठी नोंदणी मोहीम सुरू

India Darpan

Next Post
solar e1703396140989

टपाल विभागाच्यावतीने ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजने’साठी नोंदणी मोहीम सुरू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011