नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा सर्वांगीन विकास व्हावा यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून मिशन मॉडेल स्कूल हा उपक्रम सन २०२३ पासून सुरु आहे. या उपक्रमास ग्रामिण भागातुन मिळणारा प्रतिसाद तसेच जिल्हा परिषद शाळांची मिशन मॉडेल स्कूल उपक्रमात सहभागाची मागणी लक्षात घेवून सन २०२४-२५ या वर्षात जिल्हा परिषदेच्या ५२१ शाळांचा मिशन मॉडेल स्कूल या उप्रकामात मध्ये समावेश करण्यात येत आहे.
या शाळांची निवड तालुकानिहाय सन्माननिय लोकप्रतिनिधींच्या मदतीने गटशिक्षणाधिकारी यांनी यापूर्वीच्या शाळांच्या परिघातील, शाळांची पटसंख्या, समाज सहभाग, भौतिक सुविधांची किमान उपलब्धता या सर्व बाबींचा विचार करुन करण्यात आली आहे. पुढील वर्षी या शाळांचे मूल्यांकन करण्यात येऊन त्यामधून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय उत्कृष्ठ मॉडेल स्कूलची निवड करण्यात येईल. अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ नितीन बच्छाव यांनी दिली.
तालूकानिहाय मिशन मॉडेल स्कूलमध्ये समाविष्ट शाळांची संख्या तपशील पुढीलप्रमाणे –
बागलाण – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – ४४ पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – ११
चांदवड – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – २० पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – २५
देवळा – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – २८ पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – ७
दिंडोरी – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – ४० पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – १०
इगतपुरी – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – ४० पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – १०
कळवण – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – ३० पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – ९
मालेगाव – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – ३७ पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – १०
नांदगाव – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – २० पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – ७
नाशिक – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – २८ पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – ८
निफाड – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – ७९ पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – ९
पेठ – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – २४ पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – ८
सिन्नर – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – २४ पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – ६
सुरगाणा – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – ४२ पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – १०
त्र्यंबकेश्वर – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – ४५ पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – १०
येवला – नवीन समाविष्ट मॉडेल स्कुल – २० पूर्वीच्या मॉडेल स्कुल संख्या – ८