नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॅफे सुरळीत चालू देण्याचे मोबदल्यात गेल्या ३ महिन्यांपासून दरमहा तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारात असणारा सहा. पोलीस फौजदार शंकर जनार्दन गोसावी हा आज २५०० रुपयाची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
या कारवाईबाबत एसीबीने सांगितले की, तक्रारदार हे नाशिक शहर पोलीस आयुक्तालायचे हद्दीत एक कॅफे/ restaurant चालवितात. सदरील कॅफे/ restaurant हे कॉलेज परिसरात असल्याकारणाने तेथे विद्यार्थी – विद्यार्थीनीं यांची वर्दळ असते. त्यामुळे विद्यार्थी यांना privacy असावी म्हणून तक्रारदार यांनी रेस्टॉरंट मधील टेबलांना आडोसा केला होता. सदर बाबत माहिती यातील आरोपी लोकसेवक यास झाल्याने त्याने सुमारे सहा महिने पूर्वी तक्रारदार यांच्याकडे येऊन त्यांना तू कुंटणखाना चालवितोस तुझ्यावर कारवाई करेन असा दम देऊन तक्रारदार यांच्या कॅफेवर कारवाई न करण्याचे मोबदल्यात त्यांच्याकडून दरमहा २ हजार ते ३ हजार रुपये लाच म्हणून घेत असे.
तक्रारदार हे फक्त रेस्टॉरंट व्यवसाय करत असून कोणताही गैरव्यवसाय करत नाहीत. म्हणून त्यांना आरोपी लोकसेवक यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार केली. सदरील तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक हे विशेष शाखा, नाशिक शहर पोलीस येथे नेमणूकीस असताना तक्रारदार चालवीत असलेल्या restuarant व्यवसायशी त्यांचा काहीएक संबंध नसताना तक्रारदार यांचे restuarant सुरळीत चालू देण्याचे मोबदल्यात गेल्या ३ महिन्यांपासून दरमहा तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारात असल्याची कबुली देऊन आज रोजी २५००/- रुपये लाच मागणी करून मागणी केली लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – ला.प्र.वि. नाशिक
*तक्रारदार- पुरुष, ३० वर्ष, नाशिक
*आलोसे – शंकर जनार्दन गोसावी, सहा. पोलीस फौजदार, नेमणूक- विशेष शाखा, नाशिक शहर पोलीस दल.
रा. फ्लॅट नंबर 108, ठक्कर हार्मनी, ए विंग, शहनाई लॉन्स जवळ टाकळी रोड, तपोवन, नाशिक
*लाचेची मागणी- दिनांक ०६/०३/२०२४ रोजी२५००/-
*लाच स्विकारली -दिनांक ०६/०३/२०२४ रोजी २५००/-
लाचेचे कारण –
यातील तक्रारदार हे नाशिक शहर पोलीस आयुक्तालायचे हद्दीत एक कॅफे/ restaurant चालवितात. सदरील कॅफे/ restaurant हे कॉलेज परिसरात असल्याकारणाने तेथे विद्यार्थी – विद्यार्थीनीं यांची वर्दळ असते. त्यामुळे विद्यार्थि यांना privacy असावी म्हणून तक्रारदार यांनी रेस्टॉरंट मधील टेबलांना आडोसा केला होता. सदर बाबत माहिती यातील आरोपी लोकसेवक यास झाल्याने त्याने सुमारे सहा महिने पूर्वी तक्रारदार यांच्याकडे येऊन त्यांना तु कुंटणखाना चालवितोस तुझ्यावर कारवाई करेन असा दम देऊन तक्रारदार यांच्या कॅफे वर कारवाई न करण्याचे मोबदल्यात त्यांच्याकडून दरमहा २०००/- ते ३०००/- रुपये लाच म्हणून घेत असे.
तक्रारदार हे फक्त रेस्टॉरंट व्यवसाय करत असून कोणताही गैरव्यवसाय करत नाहीत. म्हणून त्यांना आरोपी लोकसेवक यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार केली. सदरील तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक हे विशेष शाखा, नाशिक शहर पोलीस येथे नेमणूकीस असताना तक्रारदार चालवीत असलेल्या restuarant व्यवसायशी त्यांचा काहीएक संबंध नसताना तक्रारदार यांचे restuarant सुरळीत चालू देण्याचे मोबदल्यात गेल्या ३ महिन्यांपासून दरमहा तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारात असल्याची कबुली देऊन आज रोजी २५००/- रुपये लाच मागणी करून मागणी केली लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु आहे.
*आलोसे यांचे सक्षम प्रधिकारी – पोलीस उपायुक्त, नाशिक शहर
*सापळा अधिकारी – संदीप बबन घुगे , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक–
पोलीस नाईक/ गणेश निंबाळकर*
पोलीस शिपाई / नितीन नेटारे*
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक* .