शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मनमाड स्थानकातून मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस रवाना….

मार्च 6, 2024 | 9:10 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240306 WA0319 e1709739575793


मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येवला व नांदगाव मतदारसंघातील सुमारे १४७६ ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांना घेऊन प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ मनमाड स्थानकातून आज रात्री ८.१० मिनिटांनी रवाना झाली. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मनमाड रेल्वे स्थानकातून ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखविला.यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते.

दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथून ट्रेन मध्ये सहभागी झालेल्या भाविकांशी संवाद साधत. नाशिक ते मनमाड त्यांच्यासमवेत प्रवास केला. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, पंढरीनाथ थोरे, वसंत पवार, साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, शिवाजी सुपनर, भोलाशेठ लोणारी, मोहन शेलार, दिपक लोणारी, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, सुनील पैठणकर, विजय खैरनार, डॉ.श्रीकांत आवारे, मंगेश गवळी, दत्ता रायते, अशोक नागरे, पांडुरंग राऊत, विलास गोऱ्हे, सुरेखा नागरे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, साहेबराव आहेर, बाळासाहेब लोखंडे, प्रसराम दराडे, संतोष खैरनार, समाधान जेजुरकर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा कविता कर्डक, संजय खैरनार, धीरज बच्छाव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या ‘प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवास’ या संकल्पनेतून येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना रामलल्लाचे दर्शन घडविण्यात येत आहे. प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी या प्रवासासाठी ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ची व्यवस्था करण्यात आली आहे. ही ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ येवला व नांदगाव मतदारसंघातील सुमारे १४७६ ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांना घेऊन प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या रवाना झाली.

नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सुमारे १४ वर्षाहून अधिक काळ प्रभू रामचंद्राचे या नगरीत वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्राची कर्मभूमी असलेल्या नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ची व्यवस्था करण्यात आली.

प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवासासाठी सुमारे २२ डब्यांची ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ ही आज दि.६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ८.१० वाजता मनमाड स्थानकातून अयोध्या कडे रवाना करण्यात आली. त्यानंतर दि.७ मार्च २०२४ रोजी रात्री ९.३० वाजता अयोध्या येथे ही ट्रेन पोहचणार आहे. तर दि.८ मार्च २०२४ रोजी दुपारी ४.४० वाजता अयोध्या येथून मनमाडकडे प्रयाण करून दि. ९ मार्च २०२४ रोजी रात्री ८ मनमाड येथे पोहचणार आहे.

सदर प्रवासामध्ये जेवण, नाश्ता, चहा यासह निवासाची व दर्शनाची सुविधा असणार आहे. या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक डब्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते असणार आहे. या प्रवासातील नियोजनासाठी प्रमुख २२ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचे (ॲप) कृषिमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण…असा करावा ॲपचा वापर

Next Post

२५०० रुपयाची लाच स्विकारतांना सहा. पोलिस फौजदार एसीबीच्या जाळ्यात

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Corruption Bribe Lach ACB

२५०० रुपयाची लाच स्विकारतांना सहा. पोलिस फौजदार एसीबीच्या जाळ्यात

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011