इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालना : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या जालनातील अंतरवाली येथील जाहीर सभेला तुफान गर्दी झाली आहे. या गर्दीने उच्चांक मोडला आहे. या सभेला ११ वाजेपासून सुरुवात झाली. यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितले कोण म्हणते मराठा एक होत नाही…या सभेच्या गर्दीने उत्तर दिले, आरक्षणावर सर्व्हेक्षण झाले नाही, ५० टक्केच्या वर आरक्षण घेणार नाही, ५० टक्के आतील आरक्षण हवे. सरकारला ४० दिवस दिले होते. आम्ही एक शब्दही सरकारला विचारले नाही. आता हातात १० दिवस आहे. या दहा दिवसात आरक्षण द्या, नाही दिले तर ४० व्या दिवशी सांगू असे ते म्हणाले. २२ ऑक्टोंबरला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, माझा मराठा समाज शांततेत आला व शांततेत घरी जाणार आहे. मराठा समाज दिलेला शब्द मोडत नाही. या सभेच्या सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावे, गुन्हे मागे घेतले नाही ते तातडीने मागे घ्यावे असे सांगितले. या सभेत त्यांनी भुजबळांवरही जोरदार टीका केली. भुजबळांना आता गप्प घरात बसावे , फडणवीसांनी सदावर्तेला समज द्यावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मला मरण आले तरी चालेल असे सांगत, मराठा आरक्षण मिळल्याशिवाय गप्प बसणार नाही असे सांगून समारोप केला.
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी इथून राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी गेल्या काही दिवसापासून जय्यत तयारी सुरू होती. त्यानंतर आज राज्यातील सर्व मराठा बांधवांनी या सभेला मोठा प्रतिसाद दिला.
अशी होती तयारी
या सभेसाठी १० फूट उंच स्टेज सभेसाठी उभारण्यात आला होता. या सभेसाठी जवळपास १०० एकर जागा निश्चित होती. परंतु एवढी जागा अपुरी पडेल या दृष्टिकोनातून परिसरातील आणखी जागा साफ करण्यात आली आहे. आता ही सभा १७० एकर ग्राऊंडवर घेण्यात आली. त्यात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. या सभेसाठी दहा हजार स्वयंसेवक हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे दहा अग्निशमन दलाच्या गाड्या, ११० रुग्णवाहिकासह डॅाक्टर उपस्थितीत होते. या ठिकाणी ५० पाणी टँकर पिण्याच्या पाण्यासाठी होते. १००० लाऊड स्पीकर, 20 LED स्क्रीनही लावण्यात आल्यामुळे या सभेत भाषणांचा आवाज व चित्र सर्वांना स्पष्ट दिसत होते.