नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२३-२४ वर्षात जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी मिशन मॉडेल स्कुल उपक्रम सुरु आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या १२८ शाळांची पाहिल्या टप्यात निवड करण्यात आली होती. या शाळांमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, भविष्यवेधी शिक्षण विचार प्रशिक्षण अंमलबजावणी, मॉडेल स्कूल मधील उपक्रमांची कार्यवाही, मनरेगा अंतर्गत कामे, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयावर वर्षभर विविध कामे व उपक्रम राबविण्यात आले. त्या आधारे या शाळांचे क्षेत्रिय अधिका-यामार्फत मुल्यांकन करण्यात आले.
मुल्यांकनाचे विश्लेषण करण्यासाठी ४ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती या मुल्यांकन समितीने मुल्यांकनाच्या आधारे विश्लेषण करुन उत्कृष्ट काम करणा-या मॉडेल स्कूलची गुणवत्तेवर आधारित जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय “जिल्हा परिषद आदर्श शाळा” पुरस्कारासाठी निवड केली आहे. हया शाळांना प्रोत्साहन मिळावे तसेच शाळांनी एकमेकांशी निकोप स्पर्धा करुन जिल्हा परिषद शाळांचा सर्वांगिण विकास व्हावा, तसेच पुरस्कार रुपाने प्राप्त रक्कमेचा जिल्हा परिषद शाळांच्या गरजा भागविल्या जाव्यात यासाठी जि.प.सेस निधीतून या शाळांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वतीने लवकरच या पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी दिली.
जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार” चे स्वरुप खालीलप्रमाणे-
जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार ७५ हजार रु.
जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार ५० हजार रु.
जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार २५ हजार रु.
जिल्हास्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार १० हजार रु.
तालुकास्तरीय पुरस्कार –
तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार – ११ हजार रु.
तालुकास्तरीय द्वितीय पुरस्कार – ५ हजार रु.
या शाळांना जिल्हास्तरीय पुरस्कार –
प्रथम – जि.प. शाळा शिवडे, ता. सिन्नर
द्वितीय – वाजपेयी इंटरनेशनल स्कुल भोयेगाव, ता. चांदवड
तृतीय – जि. प. शाळा जऊळके दिंडोरी ता. दिंडोरी
उत्तेजनार्थ – जि.प. शाळा मोडाळे, ता. इगतपुरी
या शाळांना तालुकास्तरीय पुरस्कार –
इगतपुरी – प्रथम – जि.प. शाळा वाडीवऱ्हे
द्वितीय जि.प. शाळा भावली खुर्द
कळवण – प्रथम – जि.प. शाळा भेंडी
द्वितीय – जि.प. शाळा गणोरे
चांदवड – प्रथम – जि.प. शाळा मंगरूळ
द्वितीय – जि.प. शाळा कुंडलगाव
त्र्यंबकेश्वर – प्रथम – जि.प. शाळा वाघेरा
द्वितीय – जि.प. शाळा ठाणापाडा
दिंडोरी – प्रथम – जि.प. शाळा अहिवंतवाडी
द्वितीय जि.प. शाळा विळवंडी
देवळा – प्रथम – जि.प. विद्यानिकेतन शाळा देवळा
द्वितीय – जि.प. शाळा रामनगर
नांदगाव – प्रथम – जि.प. शाळा साकोरे
द्वितीय जि.प. शाळा नांदूर
नाशिक – प्रथम – जि.प. शाळा विल्होळी
द्वितीय जि.प. शाळा मातोरी
निफाड – प्रथम – जि.प. शाळा कारसूळ
द्वितीय जि.प. शाळा खडकमाळेगाव
पेठ – प्रथम – जि.प. शाळा दोनवाडे
द्वितीय जि.प. शाळा जळे
बागलाण – प्रथम – जि.प. शाळा नवेरातीर
द्वितीय जि.प. शाळा वायगांव
मालेगाव – प्रथम – जि.प. शाळा साजवहाळ
द्वितीय जि.प. शाळा पाटणे
येवला – प्रथम – जि.प. शाळा उंदीरवाडी
द्वितीय जि.प. शाळा राजापूर
सिन्नर – प्रथम – जि.प. शाळा पांगरीबुद्रुक
द्वितीय – जि.प. शाळा मुसळगाव
सुरगाणा – प्रथम – जि.प. शाळा अंबाठा
द्वितीय जि.प. शाळा करवंदे