मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांच्या विरुध्द दाखल केलेल्या मानहानी खटल्यात आज जिल्हा न्यायालयाकडून खा.संजय राऊत यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता
३० मार्च रोजी होणार आहे.
मालेगाव न्यायालयाच्या खटल्याविरोधात संजय राऊतांनी जिल्हा न्यायालयात अपील केले होते. यावेळी विरोधी पक्षाकडून लेखी युक्तीवाद करण्यात आला होता. या लेखी युक्तीवादाला उत्तर देण्यासाठी राऊतांच्या वकिलांनी वेळ मागीतला आहे. जिल्हा न्यायालयाने ही मागणी मान्य केली.
मंत्री भुसे यांच्या विरोधात अशा आशयाची बातमी यापूर्वी दुसऱ्या वर्तमानपात्रात छापून आली. त्यामुळे राऊत यांनी छापलेल्या बातमीमुळे बदनामी होऊ शकत नाही. त्याचबरोबर कंपनी लॉ क्रिमिनलकडे एक वाद प्रलंबीत आहे. त्यामुळे हा खटला चालूच शकत नाही असा दावा राऊत यांच्या वकिलांनी केला.