गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘मोऱ्या’च्या मदतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…चित्रपटगृहात प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

by India Darpan
मार्च 6, 2024 | 7:42 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240306 WA0286 1 e1709734337102

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काही व्यक्ती अशा असतात की त्यांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष केल्यानेच मिळते. त्यात पहिला नंबर म्हणजे सफाई कामगार. त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळात जगातील दुर्गंधी साफ करण्यासोबत होते. अश्याच एका सफाई कामगाराचे आयुष्य रेखाटणाऱ्या ‘मोऱ्या’ चित्रपटाने चित्रपटातील नायकाप्रमाणेच ‘सेंसॉर प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष केला आहे.

‘मोऱ्या’ची व्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी सेंसॉर अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन समज दिली आणि त्यांनतर जवळपास तीन वर्ष सुरु असलेला हा प्रदीर्घ संघर्षाचा लढा संपून ‘मोऱ्या’ अखेर सेन्सॉरमुक्त झाला. ही लढाई सप्टेंबर २०२२ पासून सुरु होती, ती अखेर २७ फेब्रुवारी २०२४ रोजी संपुष्टात आली. यासाठी पत्रकार हर्षल मळेकर यांनी बातमीच्या माध्यमातून याची दखल घेत या विषयाकडे लक्ष वेधले. तर मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात माई या राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा जेष्ठ महिला पत्रकार सौ. शीतल करदेकर आणि मुख्यमंत्र्यांचे खाजगी जनसंपर्क अधिकारी विराज मुळे यांनी विशेष पाठपुरावा करून हे प्रकरण मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने अखेर ‘मोऱ्या’ सेंन्सॉरमुक्त मुक्त झाला.

‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात एका सफाई कर्मचाऱ्यांची हृदयस्पर्शी कथा रेखाटण्यात आली असून ती अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी आपल्या सहजसुंदर नैसर्गिक – संयमी अभिनयाने हुबेहूब उभी केली आहे. प्रमुख सहकलाकार उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, बालकलाकार रुद्रम बर्डे इत्यादींचा अभिनय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार मिळविणारा आणि सफाई कामगाराच्या जीवनावर बेतलेला ‘मोऱ्या’ आता येत्या २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांत ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळविणाऱ्या मोऱ्या चित्रपटगृहात जाऊन पहावा आणि मराठी अस्मिता जागवावी.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या…चुंचाळे शिवारातील घटना

Next Post

महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी ‘रोडमॅप-२०३५’ तयार…बघा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत

India Darpan

Next Post
unnamed 2024 03 06T195529.794 e1709735216316

महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी ‘रोडमॅप-२०३५’ तयार…बघा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011