नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ५५ वर्षीय महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना चुंचाळे शिवारातील घरकुल योजना भागात घडली. विजयलक्ष्मी शक्तीराम कुमार (रा.संविधान चौक,घरकुल योजना) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजयलक्ष्मी या महिलेने सोमवारी (दि.४) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात किचनमध्ये छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पती शक्तीराम रामानंद कुमार यांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.