भंडारा (इंडिया दर्पण वृत्तेसवा)- काही ठिकाणी जनावरांची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे त्यांना गौशाळेत पाठवले जाते. पण, गौशाळाच काळजी घेणार नसेल तर अशा गौशाळेवर कडक कारवाई करणे गरेजेचे आहे. जनावराची काळजी न घेतल्यामुळे ३० जनावंराचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा येथील पवनी येथील गौशाळेत घडली. चारा पाण्याविना या जनावरांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही जनावरे कत्तलखान्यात नेण्यापासून वाचली असली तरी गौशाळेत मात्र त्यांचा जीव गेला.
गडचिरोलीतील कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्यात नेणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन गौशाळेत पाठवले होते. मात्र तिथे चारा आणि पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे तीस जनावरे दगावली. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गौशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतले आहे.गौशाळेत जनावरांना ठेवण्यासाठी शेड, पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना, या गौशाळेकडे शेड नव्हते. ही सर्व जनावरे उघड्यावर होती.
गेल्या वर्षी या गौशाळेच्या अध्यक्षांसह १३ संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता या गौशाळेविरुध्द कडक कारवाई करुन त्यांना अद्दल घडवणे गरजेचे आहे.