नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनपाचे मुकणे रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये बस वे दुरुस्ती काम, २२० केव्ही पीटी बदलणे व इतर अनुषंगिक कामे करणे कामी शनिवार ९ मार्च २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपावेतो पॉवर सप्लाय बंद ठेवणेत येणार आहे. त्यामुळे शहरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे.
पाणीपुरठा होणार या भागात होणार नाही
विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथून होणारा पाणी पुरवठा करणं शक्य होणार नसल्याने शनिवार ९ मार्च २०२४ रोजी नाशिक शहरातील नवीन नाशिक विभागातील प्रभाग क. २२,२८,२९,३१, नाशिक पुर्व विभागातील प्रभाग क्र. ३०,२३ (भागशः), नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. २२ (भागशः) व सातपूर विभागातील प्रभाग क्र. २४,२५,२६ (भागशः) भागास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. तसेच रविवार १० मार्च २०२४ रोजी पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तरी सदर भागातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती.