नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पावधीत जास्त नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने तब्बल सव्वा ४७ लाखास गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टॉक मार्केट ट्रेंडिग मध्ये गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने शहरातील दोघांची फसवणूक झाली आहे.
कॉलेजरोड भागातील अजिंक्य विजय कुलकर्णी (रा.पाटील लेन.न३ कॉलेजरोड) यांनी फिर्याद दिली आहे. कुलकर्णी यांच्यासह अन्य एकाची यात फसवणुक झाली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात कुलकर्णी आॅनलाईन गुतवणुकीबाबत इंटरनेटवर शोध घेत असतांना भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. वेगवेगळ्या मोबाईल नंबर तसेच व्हॉटसअप आणि सोशल साईडवरून संपर्क साधात भामट्यांनी कुलकर्णी यांच्यासह अन्य एकास स्टॉक मार्केट ट्रेंडिग मध्ये गुंतवणुक केल्यास अल्पावधीत चांगला नफा देण्याचे आमिष दाखविले होते.
या घटनेत दोघांना ४७ लाख १२ हजार ५४८ रूपयांची गुंतवणुक केली असता ही फसणुक झाली. अनेक महिने उलटूनही गुंतवणुक व नफ्याची रक्कम अदा करण्यात आली नाही त्यामुळे कुलकर्णी यांनी पोलीसात धाव घेतली असून कॉल करणा-या नंबर धारकांसह पर्स वर्ग करण्यात आलेल्या बँक खातेदारांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.