अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आली असल्याचे बोलले जात आहे. ही धमकी आल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी ‘एमआयएम’चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची चौकशी करण्याची मागणी केल्यामुळे याप्रकरणाता वेगळे वळण लागले आहे.
ही धमकी व्हॉटसअॅपवर क्लिप पाठवून देण्यात आली असून त्याच्या मेसेजमध्ये भाजपच्या नेत्यांची नावे घेतली आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांच्या स्वीय साहाय्याक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर मेसेज पाठवणाऱ्या विरुद्ध कलम 354 A,354 D,506 (२),67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या धमकी प्रकरणाची राज्याच्या गृहविभागाने गंभीर दाखल घेतली आहे. परंतु धमकी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आली आहे. यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.