नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामिण पोलीसांनी सिन्नर शहरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरूणास गजाआड केले आहे. या तरुणाकडून देशी बनावटीच्या पिस्तूलसह दोन जीवंत काडतुसे हस्तगत केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरात एक तरूण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.४) स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला असता संशयित पोलीसांच्या जाळय़ात अडकला. शाहू हॉटेल भागात संशयास्पद फिरणा-या तरूणास पथकाने ताब्यात घेतले असता संशयिताच्या अंगझडतीत देशी बनावटीचा पिस्तूल व दोन जीवंत काडतुसे मिळून आले.
पोलीस तपासात अग्निशस्त्र कोठून व का आणले याबाबत विचारपूस सुरू असून संशयितास मुद्देमालासह सिन्नर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई हवालदार चेतन संवस्तरकर,प्रविण सानप,हेमंत गरूड,शिपाई विनोद टिळे,गिरीष बागुल,हेमंत गिलबिले व प्रदिप बहिरम आदींच्या पथकाने केली.