नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने वेगवेगळय़ा भागात मॅफेड्रोन या अमली पदार्थ विक्री प्रकरणात पसार झालेल्या संशयितासह एका तडिपारास पोलीसांनी गजाआड केले आहे. राहूल नारायण शिंदे (रा.हनुमाननगर,अमृतधाम) व रोहित योगेश पवार (रा.शुभम अपा.शांतीनगर,म्हसरूळ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे. एनडीपीएसच्या गुन्ह्यातील संशयितास आडगाव तर तडिपारास म्हसरूळ पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
या आरोपीमध्ये रोहित पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात पोलीसांनी हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. आडगाव शिवारात गेल्या १४ फेब्रुवारी रोजी धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दुल (रा.राजवाडा,दिंडोरीरोड) या मॅफेड्रॉन विक्रेत्यास पोलीसांनी बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. दुचाकीस्वार संशयिताच्या अंगझडतीत २७ हजार ५०० रूपये किमतीचा अमली पदार्थ आढळून आला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुह्यात राहूल शिंदे याचा सहभाग असल्याचे तपासात पुढे आल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र तो पसार झाला होता.
युनिट १ चे अमंलदार नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शिंदे मंगळवारी (दि.५) बळीमंदिर परिसरात येणार असल्याच्या माहितीवरून पथकाने परिसरात सापळा लावला असता संशयित पोलीसांच्या जाळयात अडकला. त्यास आडगाव पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून दुसरी कारवाई मखमलाबाद येथील शांतीनगर भागात करण्यात आली. गुन्हेगारी पार्श्वभूमिमुळे हद्दपारीची कारवाई करण्यात आलेला रोहित पवार याचा शहरातच वावर असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याचा शोध घेत असतांना मंगळवारी युनिटचे राजेश राठोड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शांतीनगर भागात संशयित फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर,उपनिरीक्षक चेतन श्रीवंत,विष्णू उगले हवालदार देविदास ठाकरे,शरद सोनवणे,धनंजय शिंदे पोलीस नाईक मिलींदसिंग परदेशी अंमलदार नितीन जगताप,राजेश राठोड,राहूल पालखेडे,मुक्तार शेख,आप्पा पडवळ,रामा बर्डे व चालक समाधान पवार आदींच्या पथकाने केली.