नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रधानमंत्री जनमन योजेनंतर्गत आदिम कातकरी समाजाची वास्तव्य असलेल्या आठ तालुक्यांसाठी ५ मोबाईल मेडिकल युनिट पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकात वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक मोबाईल मेडिकल युनिटमध्ये ४ वैद्यकीय कर्मचारी असे १६ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित केले.
यापूर्वी एक मोबाईल मेडिकल युनिटचे पथक कार्यरत यात आता ४ पथकांची भर पडल्याने ५ पथकांमार्फत आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील दिंडोरी, इगतपुरी, नांदगाव, नाशिक, निफाड, पेठ, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतील आदिम कातकरी समाजातील वंचित घटकासाठी आरोग्य सुविधा देण्याचे काम मोबाईल मेडिकल युनिट पथक करणार आहे.