मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाडचे माजी नगराध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक मंडळाचे माजी संचालक दिलीप पाटील यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ११.३० वाजता राहत्या घरापसून मनमाड येथून निघणार आहे.
दिलीप पाटील यांनी राजकारणाची सुरुवात सहकार क्षेत्रातून केली. त्यानंतर ते नगरसेवक, नगराध्यक्ष झाले. या काळातच त्यांनी मराठा विद्याप्रसारक मंडळावर निवड झाली. सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या नगराध्यक्ष काळात शहरात अनेक विकासकामे झाली.