इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
फेसबुक व इंस्टाग्रामची डाऊन झालेली सर्व्हिस पुन्हा मंगळवारी रात्री एक तासाने पुन्हा सुरु झाली. हे दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॅार्म का डाऊन झाले याचे कोणतेही कारण अद्याप पुढे आले नाही व मेटाने त्याचे स्पष्टीकरण दिले नाही. पण घडलेल्या प्रकराबद्दल मेटाने ट्विट करत सांगितले की, आम्हाला माहित आहे की काही लोकांना पूर्वी आमच्या ॲप्समध्ये प्रवेश करण्यात समस्या येत होती. यामुळे झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत, आणि आमच्या कार्यसंघांनी निराकरण करण्यासाठी त्वरीत काम करत असताना तुमच्या संयमाबद्दल धन्यवाद!
मंगळवारी रात्री ९.३० वा भारतात फेसबुक आपोआप लॉगऑऊट झाले होते. त्यानंतर इंस्टाग्राम देखील डाऊन असल्याची माहिती आली. त्यामुळे या दोन्ही प्लॅटफॅार्मटच्या युजरकडून प्रचंज नाराजी व्यक्त करण्यात आली. या दोन्ही प्लॅटफॅार्मवरुन सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आले त्यानंतर फेसबुक अकाऊंट लॉगऑऊट झाले होते. पुन्हा लॉगइन केल्यानंतर पासवर्ड नाकारले जात होते. यात तुमचा लॉग इन कालबाह्य झाला आहे असा एरर मेसेज दिसत होता. परत लॉग इन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची क्रेडेन्शियल्स नाकारली जात होती.
ही सेवा अगोदही अशीच खंडीत झाली. पण, आता का झाली याची माहिती पुढे आली नाही. एक तासाहून अधिक ही सेवा खंडीत झाल्यानंतर ती पुन्हा सुरु झाली असली तरी काहींच्या तक्रारी अद्याप आहेच…