नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दारु दुकानाचा परवाना रद्द करण्याची धमकी देऊन कारवाई न करण्यासाठी दरमहा २० हजार रुपयाची मागणी करून तडजोडी अंती १५ हजार रुपये लाचेची रक्कमेची लाच स्विकारणा-या राहुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नारायण गर्जे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यांच्याव राहुरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे आय.एम. मोटवानी वाइन शॉप राहुरी, अहमदनगर येथे व्यवस्थापक म्हणून नोकरीस आहे. ते लिकरचां सप्लाय करतात. तक्रारदार यांच्या आय. एम. मोटवानी वाइन शॉपमध्ये नगर जिल्ह्यातून येणाऱ्या लिकर खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर व तक्रारदार यांच्यावर कारवाई करून तक्रारदार यांना गुन्ह्यात आरोपी करून दुकानाचे परवाना रद्द करण्याची धमकी देऊन तक्रारदार व त्याच्या ग्राहकांवर कारवाई न करण्यासाठी दरमहा २० हजार रुपयाची मागणी करून तडजोडी अंती १५ हजार रुपये लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली. सदर रक्कम स्वीकारताना लोकसेवक सहा.पो. उप.निरिक्षक ज्ञानदेव नारायण गर्जे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आलोसे ज्ञानदेव नारायण गर्जे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे विरुद्ध राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*यशस्वी सापळा कारवाई
*युनिट -*नाशिक
*तक्रारदार-* पुरुष,वय- 50 वर्ष
*आलोसे- 1)ज्ञानदेव नारायण गर्जे, स. पो. उपनि राहुरी पोलिस स्टेशन, अहमदनगर, राहणार – भाग्योदय रो हाउस तपोवन रोड, राजबिर हॉटेल समोर मुक बधीर विद्यालय जवळ अहमदनगर.
*लाचेची मागणी- 20000/- रुपये दिनांक-05/03/2024 रोजी
*लाच स्विकारली- 15000/ रुपये दिनांक-05/03/2024 रोजी
*हस्तगत रक्कम- 15000/-रुपये
लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे आय.एम. मोटवानी वाइन शॉप राहुरी, अहमदनगर येथे व्यवस्थापक म्हणून नोकरीस आहे. ते लिकरचां सप्लाय करतात. तक्रारदार यांच्या आय. एम. मोटवानी वाइन शॉपमध्ये नगर जिल्ह्यातून येणाऱ्या लिकर खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर व तक्रारदार यांच्यावर कारवाई करून तक्रारदार यांना गुन्ह्यात आरोपी करून दुकानाचे परवाना रद्द करण्याची धमकी देऊन तक्रारदार व त्याच्या ग्राहकांवर कारवाई न करण्यासाठी दरमहा 20,000 रुपयाची मागणी करून तडजोडी अंती 15000 रू लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली. सदर रक्कम स्वीकारताना लोकसेवक सहा.पो. उप.निरि. ज्ञानदेव नारायण गर्जे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आलोसे ज्ञानदेव नारायण गर्जे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे विरुद्ध राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा व तपास अधिकारी – निलिमा केशव डोळस, पोलीस निरीक्षक, ला..प्र.वि. नाशिक
सापळा पथक – पोलिस नाईक संदीप हांडगे, पोलिस शिपाई सुरेश चव्हाण.