मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्यावतीने (ICC) एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जात आहे. या स्पर्घेत भारताने दोन सामने जिंकल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना आता आज १४ ऑक्टोबरला होणार आहे.
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान चार वर्षांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये आणि पाच वर्षांनंतर एकदिवसीय भिडले. हे दोन संघ यापूर्वी २०१८ मधील एकदिवसीय आशिया चषक आणि चार वर्षांपूर्वी २०१९ विश्वचषक स्पर्धेत एकदिवसीय फॉर्मेटमध्ये एकमेकांशी भिडले होते. या आधीच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर आपले वर्चस्व निश्चितपणे नोंदवले होते
मेलबर्न येथे झालेल्या टी२० विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान शेवटचे एकमेकांशी खेळले होते, जिथे विराट कोहलीने हॅरिसच्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. पाकिस्तानविरुद्धचा सामना कोणताही असो, विराट कोहली खास तयार असतो. जर तुम्हाला पाकिस्तानी गोलंदाजांचा सामना करायचा असेल तर तुम्हाला तुमची सर्वोत्तम फलंदाजी दाखवावी लागेल, असेही त्याने म्हटले आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या मागील तीन टी20 सामन्यांमध्ये विराटने ३५, ६० आणि ८२ धावांची इनिंग खेळली आहे. आताही त्याच्या बॅटवर पाकिस्तानी गोलंदाजांची विशेष नजर असणार आहे. शुभम गिल आजारातून बरा झाल्यामुळे तो या स्पर्धेमधील पहिला सामना खेळणार आहे.
भारत व पाकीस्तान हे दोन्ही संघ कागदावर तुल्यबळ आहेत. पण, भारताची बाजू भक्कम आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तानला धुळ चारल्यानंतर आता पुन्ही संधी आहे.
सुरक्षाही हाय व्होल्टेज
भारत-पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्याच्या वेळी स्टेडियम उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे मात्र सुरक्षाही हाय व्होल्टेज तैनात करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानात विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा सामना रंगणार आहे. या सामन्याच्या पूर्वीच स्टेडियम उडवून देण्याची धमकी मिळाल्याने वातावरण तापले आहे. मुख्य म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतात कुठेही सामना खेळण्यास तयार आहे, मात्र अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळवू नका, अशी विनंती वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी केली होती. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही विनंती फेटाळून लावली. पाकिस्तानने चेन्नई, हैदराबादसारखे पर्यायही दिले होते. पण, भारताने ते नाकारून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरच सामना होईल, असे स्पष्ट सांगितले.
जवळपास एक लाख लोक त्या दिवशी स्टेडियम आणि परिसरात असतील, असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पोलिसांसह एनएसजीच्या तिन्ही टीम तैनात असणार आहेत. गुजरातचे गृहमंत्री भुपेंद्र पटेल यांनी सामन्याच्या सुरक्षेचा आढावा घेतला असून यात राज्याचे ७ हजार पोलीस स्टेडियमच्या आवारात राहणार आहे. याशिवाय एनएसजी, ड्रोनविरोधी, बॉम्बस्क्वाड पथकही असणार आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफही तैनात असणार आहे.