नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागातर्फे सन २०२३-२४ या वर्षातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, मुंबई येथील डॉ. श्रेया, ऍड.गोदावरी देवकाते शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड येथे संपन्न झाला.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या गाव खेडे पाडे मध्ये तळागाळात बाल संगोपन उपोषण निर्मूलनाचे काम करतात त्यांच्या या कामाबद्दल कौतुक झाले पाहिजे व त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे म्हणून जिल्हा परिषदे अंतर्गत दरवर्षी शासन निर्णयानुसार आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार दिला जातो, नाशिक जिल्ह्यातील २६ प्रकल्पातील एकूण २६ अंगणवाडी सेविका व २६ मदतनीस यांना सन २०२३-२४ चा आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार देण्यात आले.