मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड या खासगी कंपनीला शहराचा विद्युत पुरवठ्याचा ठेका दिला असून या कंपनी विरोधात आज बारा बलुतेदार संघटने तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.
या कंपनीने तालुक्यातील खडकी येथील नितीन दादाजी पवार हा लाईनमन नसतांना त्याला पोलवर काम करण्यास सांगितल्यानंतर अन्य कर्मचा-यांच्या चुकीमुळे त्याचा अपघात होऊन त्याला दोन्ही हात गमवावे लागले. मात्र एवढे होऊन ही मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीने त्याला कुठलीही ठोस भरपाई न दिल्याने त्याच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आल्याने बाराबलूतेदार संघटनेचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी मदतीचा हात दिला.
कंपनीने त्याला नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी बाराबलुतेदार संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढत. तो विद्युत कंपनीच्या कार्यालयावर धडकला. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी अन्यथा या कंपनी विरोधात मोठ आंदोलन छेडण्याचा इशारा बंडूकाका बच्छाव यांनी दिला आहे.