मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील मोसम नदी किना-यावरील कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालकमंत्री दादा भुसे यांना मोसम नदी किना-या जवळ असलेल्या ताडी विक्री केंद्रावर मोठी गर्दी दिसल्याने भुसे यांनी थेट ताडी विक्री केंद्रात अचानक गेल्याने तेथे पळापळ सुरु झाली.
यावेळी भुसे यांनी पाहणी केली. परवानाधारक असलेल्या या ताडी विक्री केंद्रात ताडीत पांढ-या रंगाची पावडर मिक्स करुन त्याची विक्री होत असल्याच निदर्शनात येताच भुसे यांनी पोलिस तसेच राज्य उत्पादन विभागाच्या अधिका-यांना हा प्रकार निदर्शनात आणून दिला. राज्य उत्पादन विभागाने तातडीने तेथील ताडीचे नमुने घेतले असून ते टेस्टिंग साठी प्रयोग शाळेत पाठविले जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
या ताडी विक्री केंद्रामुळे आजू-बाजूच्या नागरीकांना त्रास होत होता. दरम्यान महापालिकेने तातडीने ताडी केंद्र बाहेरील अनधिकृत पत्र्याचे कंपाऊंड जेसीबी व्दारे तोडत कारवाई केली असून पोलिस अधिक तपास करीत आहे.