इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
येवला- लोकसभेच्या जागेची मागणी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) यांच्या बैठकीत करणार असून याअगोदर मी पंढरपूर येथून दोन वेळा, मुंबई येथून एक वेळा खासदार राहिलो असून मात्र शिर्डी येथे लोकसभा निवडणूक लढवली पण अपयश आले. आता शिर्डी येथे पुन्हा संधी मिळाली तर मी निवडणूक लढण्यासाठी नक्की इच्छुक असल्याचे केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
२०२६ पर्यंत मी राज्यसभेवर खासदार आहे. पण भाजपने संधी दिली तर मी शिर्डी येथून इच्छुक असल्याचे आठवले यांनी सांगितले. शिर्डी येथून आठवले यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवली होती.
पण, आता त्यांनी भाजपकडे मागणी केली आहे. केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर आठवले यांनी सरकारला समर्थन केले. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण होईल की नाही हे आता तीन्ही पक्षाच्या बैठकीतच ठरणार आहे.