इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीची जवळपास तयारी पूर्ण झाली असून १४ तारखेला निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. पण, त्याअगोदरच सोशल मीडियावर निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात बहुतांश जणांनी २०१९ प्रमाणेच यंदाही सात टप्प्यामध्ये मतदान होणार असून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होण्याची शक्यता आहे. लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी पूर्ण होणार आहे. त्याअगोदर लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार आहे.
असे असून शकते टप्प्यातनिहाय मतदान
पहिला टप्पा- जम्मू आणि कश्मीर, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नगालँड, ओडिशा, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान, लक्षद्वीप.
दुसरा टप्पा- आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, तमिलनाडु, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी.
तिसरा टप्पा- आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव.
चौथा टप्पा-बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल.
पाचवा टप्पा- राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू और काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश.
सहावा टप्पा- बिहार, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली-एनसीआर.
सातवा टप्पा- उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, चंडीगढ, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश.