इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मी सत्तेतला काटा असल्याने मला कधीही अटक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मी तयार आहे, असा दावा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठ्यांना न टिकणारे दहा टक्के आरक्षण मराठ्यांना देऊन सरकारने आमची फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याबाबत जरांगे म्हणाले, की मराठ्यांनी इतरांना आडवे करण्याचे ठरवले आहे. आमचे ३६ आमदार आहेत. त्यांची नावे मी आज जाहीर करणार नाही. ते माहिती देत असतात. सत्ता आणि मराठ्यातला मी काटा असल्याने मला बाजूला सारले जात आहे. आज आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. उद्या हीच वेळ तुमच्यावर येईल. कितीही दबाव आला, तरी मराठा एक इंचदेखील मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी केला.
ताकद दाखवायची वेळ आली, तर पुन्हा एकदा एकत्र या. गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, नाही तर याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देऊन जरांगे म्हणाले, की तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम केला तर आम्ही करेक्ट कार्यक्रम करू. मुंबईमध्ये ३६ आमदारांनी एकत्र येऊन दहा टक्के आरक्षण घ्यायला लावा, नाहीतर गुंतवा, असा कट करण्यात आला आहे. सरकारने गोडी गुलाबीने आरक्षण द्यावे, अशी मागणी करताना आमच्या नादी लागू नये, असा इशारा त्यांनी दिला. मला तुरुंगात टाकले, तरी तिथे मोर्चा काढील, असेही ते म्हणाले…