मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड जवळच्या कातरवाडी येथे अन्न-पाण्याच्या शोधात भटकत शेतात आलेल्या हरिण व काळविट कांद्याच्या शेतात आलेल्या ड्रीपच्या नळीत अडकले.
काळवीटाचे शिंग व हरणाच्या गळ्या भोवती फास बसल्याने त्याच अवस्थेत ते सैरावैरा धावू लागले. स्थानिक वन्यजीवप्रेमी व वनरक्षकांच्या दोन तासांच्या महत्प्रयासाने या दोघा प्राण्यांची त्यातून सुखरुप सुटका केली.
दोन तास चाललेल्या या रेस्क्यु ऑपरेशन मध्ये मात्र संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्याचे मोठ नुकसान झाल्याने वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.