इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारी वाडी येथे मोबाईलच्या दुर्घटनेत एका पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने ही घटना घडली. समर्थ तायडे असे या बालकाचे नाव आहे.
पाच वर्षाच्या समर्थने मोबाईलची खराब बॅटरी कानाला लावली. त्याचक्षणी तिचा स्फोट झाला. समर्थच्या कानाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या. तायडे कुटुंबीयांनी समर्थला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. छत्रपती संभाजीनगरच्या आमठाणा येथील तायडे कुटुंब दोन दिवसांपूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी कुंभारी वाडी येथे आले होते त्यावेळी ही घटना घडली.
मामाच्या घरी तेराव्यासाठी ते आले होते. दोन दिवसांपूर्वीच झाला होता. सोमवारीच तायडे कुटुंब मूळ गावी आमठाणा येथे परतणार होते. मात्र त्याआधीच त्याच्या वर काळाने घाला घातला. सर्मथच्या मृत्यूने तायडे कुटुंबीयांना जबर धक्का बसला.