मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई सीमाशुल्क विभाग III च्या विमानतळ आयुक्तालयाने १ ते ४ मार्च या चार दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये १.६६ कोटी रुपयांचे ३.०३ किलो सोने आणि दोन आयफोन जप्त केले.
एका प्रकरणात इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना इंडिगो विमान 6E 1122 (फुकेत ते मुंबई) मधून २४ कॅरेट सोन्याचा ७०० ग्रॅमचा दावा न केलेला सोन्याचा बार प्रवासी सीटच्या खाली आढळून आला. जप्त केलेले सोने मुंबईच्या सीमाशुल्क अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आले असून, तपास सुरू आहे. दुसऱ्या प्रकरणात, एअर इंडिया विमान AI 920 द्वारे दुबई ते मुंबई प्रवास करत असलेल्या भारतीय नागरिकाला अडवण्यात आले आणि गुदाशयात ३९० ग्रॅम निव्वळ वजनाचे मेणातले 24 KT गोल्ड डस्ट लपवून ठेवलेले आढळून आले. दुसऱ्या प्रकरणात, वेक्टर ५ जवळच्या प्रसाधनगृहात विमानतळाच्या सफाई कर्मचाऱ्यांना ३९० ग्रॅम वजनाचे मेणातले 24 KT गोल्ड डस्ट आढळून आले. जप्त केलेले सोने मुंबई सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले असून तपास सुरू आहे. चौथे प्रकरण एका भारतीय नागरिकाशी संबंधित आहे, जो सिंगापूर एअरलाइन्सचे विमान SQ 424 द्वारे सिंगापूर ते मुंबई प्रवास करत होता. प्रवाशाला अडवण्यात आले असता प्रवाशाच्या अंगावर २३५ ग्रॅम वजनाचे दोन २४ कॅरेट सोन्याचे कडे लपवून ठेवलेले आढळले. सौदी एअरलाइन्सचे विमान SV 740 द्वारे रियाध ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या आणखी एका भारतीयाला अटक करण्यात आली आणि त्या व्यक्तीच्या शरीरावर २३३ ग्रॅम वजनाच्या २४ कॅरेट सोन्याच्या बांगड्या लपवून ठेवलेल्या आढळल्या. अन्य एका प्रकरणी आणखी एक भारतीय नागरिक, दुबईहून मुंबईला एमिरेट्स फ्लाइट EK 504 ने प्रवास करत असताना त्याला अडवण्यात आले आणि त्याच्या अंगावर २३० ग्रॅम वजनाचे २४ कॅरेट सोन्याचे दागिने लपवून ठेवलेले आढळले.
स्पाईसजेट विमान SG 60 द्वारे दुबईहून स्पाईसजेट विमान SG 60 द्वारे दुबईहून मुंबईला जाणाऱ्या आणखी एका भारतीय नागरिकाला अडवण्यात आले आणि त्याने 24 कॅरेट सोन्याचे दागिने आणि 22 कॅरेट सोन्याची साखळी असे एकूण 220.00 ग्रॅम वजनाचे सोने शरीरात लपवून ठेवलेले आढळून आले. अन्य एका प्रकरणात, दुबईहून मुंबईला एमिरेट्स फ्लाइट EK 504 द्वारे प्रवास करत असलेल्या एका भारतीयाला अडवण्यात आले आणि त्या व्यक्तीने परिधान केलेल्या कपड्यांमध्ये 220 ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट सोन्याचे रोडियम प्लेटेड कडे ठेवलेले आढळले.
एअर इंडियाच्या एआय 984 विमानाने दुबई ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या आणखी एका भारतीयाला 24 कॅरेट सोन्याचे दागिने, थोडियम प्लेटेड नाणी, 215 ग्रॅम वजनाचे वायरचे कापलेले तुकडे आणि दोन आयफोन देखील जप्त करण्यात आले. या व्यक्तीच्या अंगावर सोन्याचे दागिने लपवून ठेवलेले आढळून आले, सोन्याच्या तारेचे कापलेले तुकडे अमूल बटर, रुमाल आणि कपड्यांमध्ये तर आयफोन हाताच्या पिशवीत लपवून ठेवण्यात आले होते. अन्य एक भारतीय नागरिक, इंडिगोच्या 6E 1395 विमानाने दुबई ते मुंबई प्रवास करत होता आणि त्याच्या शरीरावर 200 ग्रॅम वजनाच्या दोन 24 कॅरेट सोन्याच्या साखळ्या लपवलेल्या आढळ