नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर पाडळी फाट्यावर दोन कार एकमेकांना धडकल्या. या अपघातात दोन जण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. रविवारी रात्री साडेअकरा वाजता हा अपघात झाला.
या अपघातात रामदास धांडे (६०) मंदाताई रामदास धांडे (५५) रा पाडळी, ता इगतपुरी हे जखमी झाले आहे. या अपघातातील कार क्रं, MH.15.FF.0203 व कार क्रं.MH.46.A.2421 हा आहे. मुंबई कडून नाशिक कडे जाणा-या कारने उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. त्यात एक महिला गंभीर जखमी झाली तर चालक किरकोळ जखमी झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर जखमींना नातेवाईकांच्या सांगण्यावरून तात्काळ वाडीव-हे येथील खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.