इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वीस लाख रुपयांची लाच प्रकरणात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दोन अधिका-यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या घरातून लाचेच्या रकमेसह सव्वा कोटी रुपये जप्त केले असून अजून तपास सुरुच आहे.
रस्ते प्रकल्पासाठी प्रलंबित बिले काढणे तसेच पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात या अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारली. लाच स्विकारणारा एक अधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नागपुरात प्रकल्प संचालक असून अरविंद काळे असे त्यांचे नाव आहे, तर दुसरा अधिकारी ब्रिजेश कुमार साहू हा मध्य प्रदेशातील हरदा येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपमहाव्यवस्थापक आहेत.