इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीपदावर पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते शहबाज शरीफ यांची निवड झाली आहे. यासाठी आज झालेल्या निवडणुकीत त्यांना २०१ मते मिळाली, तर इम्रान खान यांचं समर्थन असलेल्या पीटीआयचे उमेदवार ओमर अयूब खान यांना ९२ मते मिळाली.
प्रधानमंत्री पदासाठी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल शहबाज शरीफ यांनी त्यांना पाठिंबा दिलेल्या सगळ्यांचे आभार मानले. या निवडणुकीच्या वेळी पाकिस्तानच्या संसदेत गदारोळ झाला.
पीटीआयचं समर्थन असलेल्या खासदारांनी इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी केली, तसंच शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.