इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः गेल्या महिन्यापासून पंजाब-हरियाणाच्या शंभू-खनौरी सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी सहा तारखेला दिल्लीकडे कूच करणार आहेत. दहा मार्च रोजी दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजता देशभरातील रेल्वे गाड्याही थांबवण्यात येणार आहेत.
भटिंडा येथे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, की हरियाणा-पंजाबमधील शेतकरी खनौरी-शंभू सीमेवरच आंदोलन करतील. देशातील बहुतांश भागातील शेतकरी त्या दिवशी दिल्लीला पोहोचतील. सहा मार्चला हरियाणा-पंजाब वगळता इतर राज्यातील शेतकरी आपापल्या मार्गाने दिल्लीत पोहोचतील.
शेतकरी ट्रेन-बसने दिल्लीला पोहोचू शकतात. बिहार-कर्नाटकमधून दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ट्रेनमधून अटक केली. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॉलीशिवायही दिल्लीत येऊ द्यायचे आहे की नाही हे सहा मार्चच्या मोर्चामुळे स्पष्ट होईल.