नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेजद्वारे धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुध्द अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकी प्रकरणाची तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली आहे.
या धमकी मेसेजमध्ये भुजबळ यांना तु जास्त दिवस राहणार नाही…तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही…तु नीट रहा…नाहीतर तुला बघून घेईल असे म्हटले आहे. या फोन करणा-यांचा नंबरही व्हॅाटलअपवर आला आहे.
त्यामुळे पोलिस या आरोपीचा शोध घेत आहे. ही धमकी परभणी जवळ कोणीतरी केल्याचे प्रथम दर्शनी समोर आल्याचे बोलले जात आहे. ही धमकी नेमकी काय कारणातून आली आहे. त्याचा उलगडा मेसेजमधून होत नाही.