रविवार, नोव्हेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मोदी सरकारच्या काळात २२ हजार कोटीचे अंमली पदार्थ जप्त…

मार्च 4, 2024 | 12:08 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 9


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंमली पदार्थांना आळा घालण्यात मोदी सरकारला लाभलेल्या यशाबद्दल, केंद्रीय गृह मंत्रालयाने आज तीन ध्वनी-चित्रफिती जारी केल्या. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर याबाबत टिप्पण्यांची आणि ध्वनी-चित्रफितींची मालिका जारी केली आहे. अंमली पदार्थांच्या व्यापाराबाबत मोदी सरकारच्या कठोर धोरणाचे प्रभावी परिणाम दिसू लागले आहेत. या संदर्भात अटक केलेल्यांच्या संख्येत आणि जप्तीच्या प्रमाणात झालेली प्रचंड वाढ, ही या धोरणाची फलनिष्पत्ती आहे , ” असे शहा यांनी आपल्या एका टिप्पणीत म्हटले आहे.

दुसऱ्या एका टिप्पणी मध्ये शाह म्हणाले, “ पंतप्रधान मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली सरकार आणि गुन्हे प्रतिबंधक संस्था यांच्यातील समन्वय, सहकार्य आणि सहयोगाद्वारे, अंमली पदार्थ विरोधी एक देशव्यापी अभेद्य यंत्रणा उभारण्यात आली आहे. या रणनीतीमुळे अंमली पदार्थांची जप्ती आणि गुन्ह्यांची नोंद, यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.”

शाह म्हणाले की, “#DrugsfreeBharat (अंमली पदार्थ मुक्त भारत) ही मोहीम, आपल्या भावी पिढीसाठी सर्वात मोठी भेट आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली, अंमली पदार्थांचा शोध घेणे, अंमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करणे आणि व्यसनाधीनांचे पुनर्वसन करत गुन्हेगारांना अटक करणे याद्वारे आपला देश हे लक्ष्य वेगाने साध्य करत आहे. अंमली पदार्थांच्या अवैध कारभाराला लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या बहुआयामी प्रयत्नांमुळे, जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण जवळपास 100% नी वाढले आहे आणि या प्रकरणांतील गुन्हेगारांवर नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 152% नी वाढ झाली आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2006 ते 2013 या कालावधीत 1257 गुन्ह्यांची नोंद झाली असून ही संख्या 2014-2023 या कालावधीत तिपटीने वाढून 3755 वर पोहोचली आहे. 2006-13 या कालावधी मधील अटक झालेल्यांच्या 1363 च्या तुलनेत,2014-23 या कालावधीमध्ये अटकेच्या प्रमाणात चौपट वाढ होऊन ही संख्या 5745 पर्यंत पोहोचली आहे. 2006-13 या कालावधीत जप्त केलेल्या 1.52 लाख किलो अंमली पदार्थांच्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण दुपटीने वाढून 3.95 लाख किलो इतके झाले आहे.मोदी सरकारच्या काळात जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे मूल्य 2006-13 या कालावधीतील 768 कोटी रुपयांच्या तुलनेत 30 पटीने वाढून 22,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

अंमली पदार्थ विरोधी यंत्रणांनी मोदी सरकारच्या काळात 12 हजार कोटी रुपयांचे 12 लाख किलो अंमली पदार्थ नष्ट केले. जून 2023 पर्यंत, अंमली पदार्थ नियंत्रण विभाग-NCB ने अशा 23 प्रकरणांमध्ये आर्थिक तपास करुन, 74,75,00,531 रुपये किमतीची मालमत्ता गोठवली आहे.

The Modi government's ruthless approach towards narco-trade has borne effective results. The upshot of this approach is the drastic rise in the number of arrests and seizures. #DrugsFreeBharat pic.twitter.com/JE9RSrPcDV

— Amit Shah (@AmitShah) March 3, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतीय नौदलाच्या ताफ्यात हे हेलिकॉप्टर्स दाखल होणार

Next Post

येवला येथे बौद्ध भिक्‍खु विपश्‍यना केंद्र लोकार्पण सोहळा संपन्न…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
unnamed 2024 03 04T001317.388

येवला येथे बौद्ध भिक्‍खु विपश्‍यना केंद्र लोकार्पण सोहळा संपन्न…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011