मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी असलेल्या क्वांटम एनर्जीने आज इलेक्ट्रिक टू आणि थ्री-व्हीलरसाठी भारतातील सर्वात मोठे आणि वेगाने वाढणारे बॅटरी – स्विपिंग नेटवर्क असलेल्या बॅटरी स्मार्टबरोबर धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. या सहकार्याद्वारे, बॅटरी स्मार्टचे २५ पेक्षा अधिक शहरांमधील ९०० पेक्षा स्वॅप स्टेशनचे नेटवर्क, क्वांटमच्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बॅटरी स्वॅपिंगला सहाय्य करेल, ज्यामुळे वापरकर्त्यांना दोन मिनिटांत पूर्णपणे चार्ज केलेल्या बॅटरीचा अखंड वापर करता येऊ शकेल.
या भागीदारीमुळे क्वाँटमच्या इलेक्ट्रिक फ्लीट वाहनांचा वापर करणाऱ्या राईड-हेलिंग (फोनवरून वाहतूक सेवा पुरविणारी), शेवटच्या टप्प्याचे वितरण करणाऱ्या कंपन्यांना रेंजची चिंता आणि चार्जिंगसाठी लागणाऱ्या जास्त वेळेची चिंता दूर करता येऊ शकेल. बॅटरी स्मार्टच्या क्विकस्वॅपसह, ड्रायव्हर्स रस्त्यावर अधिक वेळ घालवू शकतात आणि अधिक डिलिव्हरीज पूर्ण करू शकतात. बॅटरी स्मार्टचे बॅटरी-एज-ए-सर्व्हिस मॉडेल देखील बॅटरीजच्या आयुष्याच्या शेवटी त्यांना बदलण्याची किंमत कमी करेल, ज्यामुळे क्वांटम इलेक्ट्रिक स्कूटरच्या मालकीची एकूण किंमत कमी होईल.
क्वांटमद्वारे स्कूटरची विविध श्रेणी देऊ केली जाते ज्यातून बझनेस आणि तिचे प्रकार बझनेस प्रो, बझनेस लाइट आणि बझनेस एस यांना व्यावसायिक फ्लीट वापरासाठी अनुकूलित केले गेले आहे. शहरी केंद्रांवर बॅटरी स्मार्टच्या दाट बॅटरी स्वॅपिंगच्या पायाभूत सुविधांचा फायदा घेऊन, क्वांटमचे उद्दीष्ट हे, भारतातील वितरण, वाहतूक आणि लॉजिस्टिक कंपन्यांसाठी एक विश्वसनीय इलेक्ट्रिक मोबिलिटी पार्टनर बनण्याचे आहे.
क्वांटम ई-स्कूटरच्या संचालक सुश्री चेतना सी. म्हणाल्या, “बॅटरी स्मार्टबरोबरची आमची भागीदारी ही, इलेक्ट्रिक शेवटच्या टप्प्याच्या वाहतुकीच्या संक्रमणाला गती देण्याच्या आमच्या दृष्टिकोनास सहाय्य करते. आमच्या व्यावसायिक फ्लीट ग्राहकांसाठी सुलभ बॅटरी स्वॅपिंग सक्षम करून, आम्ही त्यांच्या ईव्ही मालकीचा खर्च कमी करू शकतो आणि त्यांना संपूर्ण भारतभर त्यांच्या इलेक्ट्रिक फ्लीट्सचे प्रमाण वाढविण्याचा आत्मविश्वास देऊ शकतो.